खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम

0

नवी दिल्ली । विकिपीडियाने आयोजित केलेल्या विकी लव्हस् मोनुमेंटस या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेत प्रशांत खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे छायाचित्र ठरले आहे. विकी लव्हस मोनुमेंट्स या संकल्पनेवर आधारित जगातील वारसा स्थळांची छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने आयोजित केली होती. जगातील ही सर्वात मोठी छायाचित्र स्पर्धा होती.

10 हजार छायाचित्रकारांचा सहभाग
या स्पर्धेसाठी जगभरातून 2 लाख 45 हजार छायाचित्रे प्राप्त झाली होती, तर जगातल्या 10 हजार छायाचित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. आग्रा ते इटलीपर्यंत अनेक वारसा स्थळांची 2 लाखांहून अधिक छायाचित्रे या स्पर्धेसाठी पाठविण्यात आली, यापैकी विकिपीडियाने 489 छायाचित्रे पुरस्कारासाठी पात्र ठरविली व अंतिमतः यातून 15 छायाचित्रे पुरस्कारासाठी निवडण्यात आली.