खगोलशास्त्रज्ञांना खुणावतोय सौरमालिकेतील नवा अजस्त्र ग्रह

0

अरिझोना। आपल्या सौरमालिकेच्या पलीकडे डोकावणार्‍या खगोलशास्त्रज्ञांना प्लॅनेट 9 हा नवा ग्रह सापडला आहे. सैध्दांतिक समीकरणांच्या आधारे या नव्या ग्रहाच्या अस्तित्वाबद्दल खगोलशास्त्रज्ञांना 100 टक्के खात्री वाटत आहे. विज्ञानात अनेक भाकिते गणिताद्वारे केली जातात आणि ती अक्षरशः खरीही ठरतात. त्यामुळे या ग्रहाबाबत आता सापडलाय, पण दिसत नाहीए असंच म्हणावं लागतंय.

पृथ्वीपेक्षा दहा पट मोठा ग्रह
कुइपरमधील ग्रहांच्या हालचालींना चालना देणारा वास्तवातील प्लॅनेट 9 कुणाला प्रत्यक्ष दिसलेला नाही. अगदी मोठमोठ्या दुर्बिणींनाही त्याचा मागमूस लागला नाही. अंतराळात किती तरी भटक्या ग्रहसदृश वस्तू आणि ग्रहही असतात. ते चांगले किंवा विनाशकारीही असतात. ते भटके कुइपरमधील ग्रहांच्या कक्षात काही काळ स्थिरावतात किंवा त्या ग्रहांनाही आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या योगे अंतराळात भटकंतीस नेतात.मायकेल ब्राऊन यांच्या मते तो नवा ग्रह पृथ्वीपेक्षा दहापट मोठा असला पाहिजे.

नेप्च्युनच्या पलिकडे अगम्य ग्रहांचा कुइपर पट्टा आहे. त्यात सेडना नावाचा लहानसा ग्रह आहे. हा सेडना कोणत्या तरी ग्रहाच्या गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली आहे. त्याचे कक्षेतील परिभ्रमण स्वतंत्र नाही, असे कुइपर पट्ट्यावर लक्ष ठेऊन असणार्‍या अभ्यासकांना वाटते. प्लुटोच्या आसपास अन्य मोठा ग्रह आहे. तो सेडनाच्या कक्षेवर परिणाम करतोय.

2अरिझोना विद्यापीठातील काट व्होक आणि रेणू मल्होत्रा यांनी बाबत माहिती देताना म्हटलं की, कुइपर पट्ट्यात आणखी पाच लहान लहान ग्रह आहेत. भोवरा फिरत असताना थोडा ढकलला तर तो तिरका होतो. पण फिरण्याचे प्रतल बदलत नाही. फक्त कोन बदलतो. सेडना व अन्य ग्रहांचं त्या अनामिक ग्रहामुळे असेच झाले आहे.

वैज्ञानिक सत्य
सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला या ग्रहाला 20 हजार वर्षे लागतील, तर प्लुटोला 248 दिवस लागतात. अर्थात हे सगळे सैद्धांतिक किंवा गणितीय निष्कर्ष आहेत. जे वैज्ञानिक सत्य मांडत असतात.