खडकदेवळा खुर्द येथे विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

शिक्षणासाठी आला होता मावशीकडे; गावात शोककळा
पाचोरा – तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील नववीच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 18 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. हर्षल विनोद पाटील (14) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो त्याच्या मावशीकडे शिक्षणासाठी आलेला होता. एस. पवार माध्यमिक विद्यालयात तो शिक्षण घेत होता. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

पालकांचे जळगाव येथे सेंट्रीगचे काम
हर्षल हा धरणगाव तालुक्यातील साळवे निसाणे येथील विनोद पाटील यांचा मोठा मुलगा होता. त्याचे आईवडील जळगाव येथे सेंट्रीग काम करतात. त्याला पुढील शिक्षणासाठी त्याच्या पालकांनी खडकदेवळा खुर्द येथील त्याची मावशी सुवर्णाबाई देविदास पाटील यांच्याकडे शिक्षणासाठी पाठविले होते. हर्षल हा दुपारी 12 वाजता घरी आला होता. तर त्यांचे मावसा व मावशी दुपारीच शेतात निघून गेले होते. या दरम्यान हर्षल यांने गळफास घेतल्याचे समजते. त्याचे मावसा मावशी सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता त्यांना हर्षल हा दोरीच्या सहाय्याने घराचा छताला गळफास घेतल्याचा अवस्थेत दिसून आला. त्याला सुदाम वाघ, दिनेश पाटील, त्याचा मावस भाऊ अमोल पाटील, रामराव पाटील, आणि पोलीस पाटील तुकाराम तेली यांनी ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल महाजन यांनी तो मृत असल्याचे घोषित केले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांच्या फिर्यादीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल याच्यावर त्याचे मुळगाव साळवे निसाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. हर्षल हा त्यांचा आई वडीलांचा एक मुलगा असून त्याला एक लहान बहीण आहे. तो अंत्यत शांत स्वभावाचा होता असे त्याचे शिक्षक सांगतात.