पाचोरा। पाचोरा ग्रामीण लोहटार खडकदेवळा गटात विज ग्राहक संवाद व तक्रार निवारण मेळावा कार्यकारी अभियंता जी.पी. सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 23 रोजी आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी लोहटार खडकदेवळा गणाच्या जि.प. सदस्या विजया पाटील तर प्रमुख पाहुणे पं.स. सभापती सुभाष पाटील, भाजपाचे राज्य परिषद सदस्य डी.एम. पाटील उपस्थित होते. मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष पाटील व डी.एम.पाटील गटातील उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करून वीज वितरण अधिकार्यांना शेतकर्यांच्या समस्यांचे त्वरीत निवारण करण्याच्या सूचना केल्यात तसेच तक्रारदारांकडून तक्रार निवारण फार्म भरून लवकरच सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी.डी.मोरे यांनी दिले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास सहाय्यक अभियंता दिपक पाटील, शुभम हेडाव, खैरनार मॅडम, ग्रामसेवक एस.पी. खांडे, नितीन पाटील, खडकदेवळा खु. येथील विशाल शेलार, संजय भिल, तारखेडा सरपंच कल्पना पाटील, अरूण पाटील, विकास पाटील, देविदास पाटील, पोपट पाटील, अर्जून पाटील, राजेंद्र पाटील, ओंकार चव्हाण, राजेंद्र पाटील, दिनकर बागुल, अनिल पाटील, रतन मोची, देवाजी पाटील, भारत पाटील, योगेश शिंपी, भूषण पाटील, पप्पु साठे, गौरव देवरे, कपुरचंद तेली, वैभव पाटील, मदन राजपूत, गजानन सुर्यवंशी, सुरेश शिनकर, व्ही.एस. पाटील, सुभाष पाटील, राहुल देवरे, भगवान पाटील, विकास पाटील, शिवाजी तेली, नाना ठाकरे, शांताराम पाटील, दत्तु शिंपी, तुकाराम तेली, प्रभाकर वाणी, गुलाब पाटील, योगेश निकम, सागर नेरपगार, बाबु खाटीक, सिताराम ब्राह्मणे, सुधाकर पाटील, संजय पाटील, भैय्या देवरे, अनिल पाटील, सुनिल पाटील, विकास पाटील, सुपडु पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.