खडकमध्ये भरदिवसा लुटले

0

पुणे : कामावर निघालेल्या व्यक्तीला सकाळी अकराच्या सुमारास तिघांनी अडवून लुटल्याचा प्रकार शिवाजी रस्त्यावर लाकडी गणपतीसमोर शुक्रवारी घडला. चिमाराव जाखड (35, रा. मार्केटयार्ड) यंनी या प्रकरणी खडक पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून त्यांना अडवून लुटणार्‍या अनोळखी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाखड हे सकाळी कागदपत्रे घेऊन निघाले होते. जाखड हे सकाळी अकराच्या सुमारास लाकडी गणपतीसमोर आल्यानंतर आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांना पकडून ठेवून त्यांच्या पाकिटातील रोख 1 हजार आणि कागदपत्रे घेऊन पळ काढला. सहायक पोलिस निरीक्षक व्ही. डी. केसकर तपास करत आहेत.