खडकाई पात्रात रंगल्या कुस्त्यांच्या दंगली

0

यावल। शहरातील पीर सय्यद अब्दुल कादरी पीर सय्यद अब्दुन्नबी कादरी राहमूदतल्लाह अल्लेह यांचा उरुस साजरा करण्यात आला. यानिमित्त खडकाई नदीपात्रात भव्य कुस्तीचे आयोजन करण्यात आले. या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये जिल्ह्यासह राज्यभरातील पहेलवानांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. याप्रसंगी सूत्रसंचालन शेख अल्ताब अब्दुल समद यांनी केले.

यांची होती उपस्थिती
जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, भारत महाजन, अब्दुल समी वाबा, फैजपुरचे नगरसेवक शेख कुरबान अख्तर रौती, युसुफ बाटली, शेख अलीम, इकराम पेलवान, सलीम सुलेमानी, भुरयाशा शेख, अलताफ अ.समद, असलम शेख मुंशी हे उपस्थित होते. पीएसआय अशोक हिरे यांच्या निदर्शनखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.