भुसावळ। शहरातील खडका रोड परिसरात मोटारसाकल जाळण्याची घटना शुक्रवार 5 रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांच्या अंतरानंतर शहरात पुन्हा दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र संतप्त भावना व्यक्त होत आह़े.
धुरामुळे परिसरात उडाली धावपळ
शहरातील खडका रोडवरील लाल बिल्डींगजवळील रहिवासी श़ेख उमर शेख शब्बीर यांच्या मालकीची दुचाकी (एमएच 19 सीएन 3166) हि आपल्या घरासमोर लावली असता अज्ञात आरोपींनी शुक्रवार 5 रोजी पहाटेच्या सुमारास जाळली. आगीचा धूर घरासह परिसरात पसरताच शेख उमर यांनी लागलीच घराबाहेर येऊन पाहिले असता, त्यांना मोटारसायकल जळाली असल्याचे दिसून आली. त्यांनी व परिसरातील रहिवाशांनी लागलीच धावपळ करुन पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत वाहन पुर्णपणे जळले होते.
40 हजार रुपयांचे झाले नुकसान
या घटनेत 40 हजार रुपयांचे नुकसान झाले असून बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली आह़े. दरम्यान, शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी तसेच चारचाकीला मध्यरात्री आग लावण्याचे प्रकार उघड झाले होत़े मनोविकृत इसमांकडून आगी लावल्या जात असल्याचा अंदाज आहे. मात्र पोलिसांकडून अद्यापही दोषींना पकडले जात नसल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आह़े