खडकारोड परिसरात विवाहितेवर अत्याचार

0

भुसावळ । खडका रोड परिसरात नवीन बाधकांम सुरु असलेल्या घराची देखरेख करणार्‍या पहारेकर्‍याच्या पत्नीवर अत्याचार करुन याची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली यासंदर्भात पिडीत महिलेल्या पतीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

नेपानगरचे मूळ रहिवाशी
पती-पत्नी व मुले असा हा परिवार नवीन घर बांधकाम सुरु असल्यामुळे समोरील हॉटेलमध्ये राहत होते. येथील खडका रोडलगत बालाजी तोलकाट्याजवळ रमजान अन्सार सैय्यद यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी मध्यप्रदेशातील नेपानगर येथील परिवाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हा परिवार याठिकाणी पहारेकरी म्हणून काम करतो. 25 जूनरोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास शाकीर उर्फ गोलू सैय्यद रशीद याने बांधकाम सुरु असलेल्या घरात घुसून पिडीत महिलेच्या पतीस व महिलेस चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार केले. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दोन महिन्यांपासून शाकीर उर्फ गोलू सैय्यद रशीद हा या महिलेस त्रास देत होता पिडीत महिलेच्या पतीने बाजारपेठ पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला त्याला पोलीसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले तपास सपोनि पवार करीत आहे.