भुसावळ । तालुक्यातील खडका येथे संत रोहिदास महाराज यांची 642 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते करण्यात आले. सुत्रसंचालन प्रदिप सांभरे यांनी केले. तसेच त्यांनी संत रोहिदासांच्या जीवन व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. संदिप घुले, विनोद लोडते यांनी मनोगत व्यक्त केले तर राजेश जाटवे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास मनोज गोठवाल, किशोर जारवाल, हरीश बागडे, कमल बागडे, गणेश सोनवणे, देवानंद सांभरे, अशोक सांभरे, ज्ञानेश्वर सांभरे, प्रकाश सोनवणे, त्र्यंबक सावकारे यांसह समाजबांधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. यशस्वीतेसाठी राजेश जाटवे, गणेश सोनवणे, अनंता सुर्यवंशी, शांताराम सुरडकर, गजानन इंगळे, बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले.