पिंपरी-चिंचवड : निनावी तक्रार अहवालाची चौकशी करणार्या राखीव पोलिस उपनिरिक्षकाने अहवाल सकारात्मक पाठविण्यासाठी चक्क 10 हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याने ही लाच सहकारी पोलीस हवालदाराच्या बँक खात्यात जमा करुन घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ज्ञानदेव सोपान बारबोले (वय 52, लोहमार्ग मुख्यालय, खडकी) याच्यावर कारवाई केली आहे. यासंदर्भात 51 वर्षीय तक्रारदाराने निनावी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. याच तक्रारीचा अहवाल सकारात्मक पाठविण्यासाठी बारबोले यांनी 10 हजार रुपये पोलीस हवालदाराच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगून ते जमा करुन घेतले होते.