खडकी : येथिल एका वृत्तपत्रविक्रेत्याच्या वाहनाची तोडफोड केल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी एकास अटक केली असुन घटनेतील मुख्य सुत्रधार व एक सहकारी असे दोघे फरार आहेत. अटक केलेल्या आरोपीचे नाव भाग्येश पवार (वय 25 रा.खडकी बाजार) असे असुन या घटनेतील मुख्य सुत्रधार व त्याचा सहकारी असे दोघेजण फरार आहेत. पेपर विक्रेते नितिन शिंदे (वय 40,रा.खडकी बाजार) यांनी फिर्याद दिली आहे. टांगा स्टँन्ड येथे शिंदे यांचे ओमकार न्युजपेपर एजन्सी आहे. परवाना असलेल्या हातगाडीवर पेपर विक्री करतात. दि.8 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस लाईन गेट जवळ उभी केलेल्या शिंदे यांच्या मारुती व्हॅन (क्रमांक एम.एच.12 डी.ई 8328) या वाहनाची तोडफोड केली. याचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पोलिसांनी या आधारे पवार यांस अटक केली.