चाळीसगाव – चाळीसगाव धुळे रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर खडकी सिम फाट्याजवळ मोटारसायकल अपघातात तालुक्यातील बेलदारवाडी गणपुर वस्तीवरील एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजेपुर्वी घडली असून मेहुणबारे पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील बेलदारवाडी गणपुर वस्तीवरील कैलास तुकाराम गायकवाड (35), विष्णु भिवसन सोनवणे (35) यांचा मोटारसायकल (एम एच 15 डी आर 4204) चा चाळीसगाव धुळे रोडवरील खडकी सिम फाट्याच्या अलीकडे अपघात झाल्याने मोटारसायकल चालक कैलास तुकाराम गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेले विष्णु भिवसन सोनवणे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी धुळे रवाना करण्यात आले असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला प्रकाश तुकाराम गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन अपघाताची नोंद करण्यात आली आहे.