खडकी बुद्रुक शिवारात जळालेला मृतदेह

0

पोलिसांची धाव ; अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन

चाळीसगाव- तालुक्यातील खडकी शिवारातील एका शेतात 18 ते 20 वर्षीय तरुणीला जाळून ठार मारल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेने शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांना राखाडी रंगाची ओढणी आढळल्याने मयत ही तरुणी असावी? असा पोलिसांना कयास आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार समाधान धर्मा कोळी यांच्या मालकिचे हे शेत असून शुक्रवारी रात्री 10 वाजेनंतर आरोपींनी तरुणीला पैखाट्याच्या काड्यांमध्ये टाकून पेटवून दिल्याचा संशय आहे. घटनेची माहिती सकाळी कळताच उपअधीक्षक अरविंद पाटील तसेच चाळीसगावचे निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील, उपनिरीक्षक घोळवे, हवालदार शशीकांत पाटील आदींनी धाव घेतली.