खडकी: खडकी रेल्वेस्थानकात बुधवारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती खडकी लोहमार्ग पोलिसांनी दिली. रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक 4 येथील शेड परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
या व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे असून उंची 5.5 इंच आहे. अंगाने सडपातळ, रंगाने सावळा असून अंगात जांभळ्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची फूल पॅन्ट परिधान केली आहे. याबाबत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले असून पुढील अधिक तपास पोलीस हवलादार मिलिंद लोणारे करीत आहेत.