खडकी वाहतुक पोलिसांमुळे जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस

0
खडकी : खडकी वाहतूक पोलिसांमुळे चतुःश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव शुभम बापु सपकाळ (वय 20,रा.खडकी बाजार) असे आहे. मंगळवारी सायंकाळी खडकी वाहतूक पोलीस वाहतूक नियमनाचे काम करीत होते. गणपती मंदिरा समोरुन एक इसम अ‍ॅक्टिव्हावरून गाडी चालवित होता. त्यास पोलीस कर्मचार्‍यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पळुन जाऊ लागला. कर्मचारी लेंडवे यांनी त्यास पकडल्यावर तो इसम दारु पिऊन वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पकडलेला हा इसम शुभम सपकाळ असुन हा चतुःश्रृंगी हद्दीतील जबरी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी आहे. पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी या उत्कृष्ट कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.