खडके चाळ ते दुध फेडरेशन रस्त्याची डागडुजी

0

जळगाव । शहरातील खडके चाळ ते दुध फेडरेशनपर्यंतच्या रस्त्याची महानगरपालिकेने डागडुजी केली असल्याने या परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. या प्रश्नी गेल्या जुलै महिन्यात परिसरतील काही सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेने एकत्र येत आवाज उठविला होता व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. नागरिकांना रस्त्यावरुन प्रवास करण्यास अडचण होत होती.

जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आले होते निवेदनाद्वार माणी
शिवाजीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संदिप महाले यांच्यासह स्वामी पोतदार, ललित कोतवाल, भुषण सोनवणे, अतिश बारसे, केशव जोशी, ऋषिकेश मोरे, सागर कुटूंबळे, तुषार मालुसरे, विपुल बडगुजर, कुमार निकम, शुभम शिंदे, दिपक सोनवणे आदींनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजेनिंबाळकर यांची जुलैमध्ये भेट घेवून त्यांना शिवाजी नगर, खडके चाळ, शिव शंकर कॉलनी, जनाई नगर के.सी.पार्क, राधाकृष्ण नगर, त्रिभुवन कॉलनी या परिसरासह शिवाजीनगर ते दुधफेडरेशनपर्यंतच्या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल निवेदन देवून समस्या सोडविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याची दखल घेत मनपाने खडके चाळ ते दुध फेडरेशनपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे मुरूमाने बुजविले आहे. रस्त्याची डागडुजी केल्यामुळे नागरीकांसह वाहनधारकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या रस्त्यासह कानळदा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे व खडके चाळ, लक्ष्मी नगर, के.सी.पार्क, इंद्रप्रस्थ नगर,शिव शंकर कॉलनी, त्रिभुव कॉलनी या भागातील नागरी समस्या देखील त्वरीत सोडविण्यात याव्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदिप महाले, स्वामी पोतदार यांनी केली आहे.