खडक्यात उद्योजकाची नैराश्यातून आत्महत्या

0

भुसावळ : तालुक्यातील खडका येथे अकोला तालुक्यातील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय उद्योजकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. संतोष रामकृष्ण शिंदे (42, परसोबोडे, ता.अकोला, ह.मु.खडका) असे मयत उद्योजकाचे नाव आहे. शिंदे यांनी भाडे तत्वावर जागा घेवून एमआयडीसी कंपनी सुरू केली होती मात्र काही महिन्यांपूर्वीच ही कंपनी बंद पडल्याने त्यांची आर्थिक परीस्थिती खालावली व आलेल्या नैराश्यातून त्यांना दारूचे व्यसन लागले. मध्यरात्री घराचा दरवाजा आतून बंद करीत त्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवली. याबाबतची माहिती कळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, प्रेमचंद सपकाळे, विशाल खुजे, युनूस शेख, इब्राहीम शेख आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात बलराम भीमराव दहिभाते यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार शामकुमार मोरे करीत आहेत.