भुसावळ । डाऊन मार्गावरील खडगपूर रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक कामांमुळे रेल्वे प्रशासनाने 15 ते 19 दरम्यान मेगाब्लॉक जाहीर केला असून या मार्गावरील तब्बल 12 प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत तर दोन गाड्यांच्या वेळेत तसेच तीन गाड्या उशिराने सोडण्याचा निर्णय घेतला.
रद्द झालेल्या प्रवासी गाड्या अशा
15 व 16 रोजी 12151 कुर्ला-हावडा समरस्ता एक्स्प्रेस, 17 रोजी 12870 मुंबई-हावडा, 17 व 18 रोजी 12152 हावडा-कुर्ला समरस्ता एक्स्प्रेस, 18 रोजी 22830 शालिमार-भुसावळ, 18 रोजी 12833 अहमदाबाद-हावडा, 17 रोजी 12949 पोरबंदर-सांत्रागाछी, 19 रोजी 12950 सांत्रागाछी-पोरबंदर, 12834 हावडा-अहमदाबाद, 17 रोजी 02834 सांत्रागाछी-राजकोट एक्स्प्रेस, 18 रोजी 02822 सांत्रागाछी-पुणे स्पेशल एक्स्प्रेस, 19 रोजी 02833 राजकोट-सांत्रागाछी एक्स्प्रेस, 19 रोजी 12869 मुंबई-हावडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली.
कामाख्या व शालिमारच्या वेळेत बदल
18 नोव्हेंबर रोजी कामाख्यावरून सुटणारी 22512 कामाख्या-कुर्ला एक्स्प्रेस आसनसोल-चांडील-सिन्नी-चक्रधरपूर मार्गाने धावेल तर 18029 कुर्ला-शालिमार एक्स्प्रेस 19 रोजी टाटा नगरपर्यंत धावेल तर 18030 शालिमार-कुर्ला एक्स्प्रेस 19 रोजी टाटानगरहून सुटेल.
या गाड्या सुटणार उशिराने
19 रोजी सुटणारी 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस हावड्यावरून पाच तास 10 मिनिटे उशिराने सुटेल तर 19 रोजी सुटणारी 22893 साईनगर-शिर्डी हावडा सुपरफास्ट तीन तास पाच मिनिटे उशिराने सुटेल तसेच 18 रोजी मुंबईवरून सुटणारी 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस पाच तास पाच मिनिटे उशीरा सुटेल.