खडसेंची कार्यकर्त्यांसोबत चर्चा; थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार !

0

जळगाव: भाजपने माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथराव खडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही होते. स्वत: खडसे देखील त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र पक्षाने त्यांन उमेदवारी दिली नाही. याबाबत त्यांची कार्यकर्त्यांशी चर्चा सुरु असून थोड्याच वेळात ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी मोठी गर्दी झाली आहे. कार्यकर्त्यांकडून त्यांना वेगळा निर्णय घेण्याबाबत आग्रह केला जातो आहे.