खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जय्यत तयारी

0

सोशल मीडीयावर ‘राष्ट्रवादी पुन्हा’चे स्टेट्स

जळगाव: भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी प्रवेश निश्‍चीत मानला जात आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू असुन त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक यांच्याकडून राष्ट्रवादी प्रवेशाची जय्यत तयारी केली जात आहे. प्रवेशाआधीच सोशल मीडीयावर खडसेंचा फोटो असलेले ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हा व्हिडीओ आणि स्टेट्स व्हायरल होत आहे.