जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशनतर्फे श्रीराम विद्यालयात आरोग्य शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, मनपा गटनेते भगत बालाणी, माजी नगरसेवक सुनील माळी, नगरसेवक सुनील खडके, मनोज आहुजा, सुनील पाटील, नगरसेविका सरीता नेरकर, ज्योती चव्हाण, अंजना सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे, नितीन पाटील उपस्थित होते. शिबिरास दीपक फालक, दिलीप माहेश्वरी, प्रवीण कुळकर्णी, सुभाष शौचे, विनोद मराठे, छाया पाटील,शोभा कुळकर्णी, सरोज पाठक यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरामध्ये जनरल फिजिशीयन : डॉ. सुयोग चौधरी, डॉ. अभिषेक ठाकुर, डॉ. अक्षय देशमुख, डॉ. राजेश सुरळकर; शल्यचिकीत्सक : डॉ. सुरेश सुर्यवंशी, डॉ. किरण पाटिल, डॉ. मिलींद चौधरी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीलिमा बोरोले, स्वप्निल बढे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विवेक चौधरी, डॉ. गणेश पाटील, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन जावळे, डॉ. अनुज पाटील, डॉ. युवराज पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ नेत्रज्योती हॉस्पीटल व कांताई नेत्रालयातील सर्व डॉक्टर्स, डॉ. सुप्रिया पेंढके, दंतरोग तज्ज्ञ डॉ. तुषार विसवे, डॉ. कामिनी विसवे, डॉ. इम्रान पठाण या डॉक्टरांच्या पथकाने सेवा दिली.