खडसेंनी घेतली भिल्ल कुटूंबियांची भेट

0

मुक्ताईनगर। राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारप्राप्त निलेश भिल हा बेपत्ता झाल्याने माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. आमदार खडसे यांनी या कुटुंबाला धीर देत निलेश व त्याचा भाऊ परत येईल, असा दिलासा दिला. निलेशची आई सुंदराबाई व वडील रेवाराम यांना त्यांनी मुले नक्की परत येतील, असा धीर दिला. खडसे यांनी पोलिसांचा तपास व इतर तपासासंदर्भात माहीतीदेखील यावेळी दिली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, बेटी बचाओ बेटी पढाओचे संयोजक डॉ. राजेंद्र फडके, योगश कोलते उपस्थित होते.