खडसे करणार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

0

जळगाव : जिल्ह्यातील शाळांना शालेय पोषण आहार साहित्य पुरवठा करणार्‍या साई मार्केेटींग अ‍ॅण्ड ट्रेडिंग कंपनीचा मक्ता 14 जून रोजी संपुष्टात आला. शाळा सुरु होण्याअगोदर नविन ठेकेदाराला पोषण आहार साहित्य पुरवठ्यासंबंधी मक्ता देणे गरजेचे होते. मात्र शाळा सुरु झाल्यानंतर पोषण आहारापासून विद्यार्थी वंचीत राहू नये यासाठी शिक्षण संचालकांच्या आदेशान्वये जुन्याच ठेकेदारामार्फत शालेय पोषण आहार धान्यादी पुरवठ्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जुन्या पुरवठादारा मार्फत करण्यात येणार्‍या पुरवठ्याला विरोध केला असून संबंधीत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री याच्याकडे करणार असल्याचे पत्रकारांशी वार्तालाप करतांना. ठेका रद्द झाल्यानंतर जुन्या ठेकेदारामार्फत धान्य पुरवठा करण्याची काय गरज असा सवाल त्यांनी केला.

गुन्हा दाखल करणार
जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांकडून पोषण आहार पुरवठ्याची मागणी होत असल्याने सांगत जुन्या ठेकेदारांमार्फत पोषण आहार पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आल्याने संबंधीत निर्णयाबाबत रविंद्र शिंदे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे माहिती अधिकारात माहिती मागविली आहे. पोषण आहार पुरवठ्यात गैरव्यवहार झाल्याचे आरोप करत त्यांनी याबाबत पोषण आहार पुरवठ्याशी संबंधीतांवर कलम 120 (ब) नुसार गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

महिनाभरात 12 वेळा पत्रव्यवहार
राज्यभरातील शालेय पोषण आहार पुरवठादारांचा ठेका शाळा सुरु होण्याअगोदर संपुष्टात आला होते. पोषण आहारापासून विद्यार्थी वंचीत राहू नये यासाठी पाययोजना करणे गरजेचे असल्याने सुरुवातीला मुख्याध्यापकांना त्यांच्या स्तरावर पोषण आहार पुरवठा करुन बिले सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारींनी दिले होते. तसेच पोषण आहार धान्यादी पुरवठा करण्यासंबंधी शिक्षणसंचालक यांच्याकडे महिन्याभरात 12 वेळा पत्रव्यवहार करण्यात आले आहे.

शिक्षणविभागाने हात झटकले
जुन्या ठेकेदारामार्फत पोषण आहार धान्यादी पुरवठ्याला विरोध होत आहे. पोषण आहार पुरवठ्यासंबंधी सर्व निर्णय शिक्षण संचालक स्तरावरुन घेतले जात असल्याचे सांगत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पुरवठ्याबाबतच्या निर्णयासंबंधी हात झटकले आहे. शालेय पोषण आहार साहित्य पुरवठा करण्यासंबंधी सर्व गोंधळ संचालक स्तरावर झाले असल्याचे दिसून येत आहे.

यात शासनाचेच नुकसान
मागील वर्षाच्या पोषण आहार साहित्याच्या किंमती या वर्षात वाढल्या आहे. किंमती वाढल्याने पुरवठादार नवीन किंमतीनुसार धान्यादी पुरवठा करणार आहे. यात शासनाचेच नुकसान होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सीईओंनी शिक्षण संचालकांना पत्राद्वारे कळविलेले असतांना शिक्षण संचालकांनी जुन्याच ठेकेदारांमार्फत धान्यादी पुरवठा करण्याचे आदेश दिले आहे.