खडसे दिल्लीत महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादवांची भेट घेणार !

0

नवी दिल्ली: सध्या महाराष्ट्राचे राजकारण भाजपातील नाराज नेत्यांवरून राजकारण तापले आहे. भाजपनेच मुलगी रोहिणी खडसे यांचा पराभव केला आहे, असे खळबळजनक आरोप एकनाथराव खडसे यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाकडून अन्याय सुरूच राहिला तर वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही भाजपला दिला आहे. महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली होती. दरम्यान आज एकनाथराव खडसे हे दिल्लीला गेले आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार असून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देणार आहे. भाजप महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांची ते भेट घेणार आहे. दिल्लीला पोहोचल्यानंतर खडसे यांनी ही माहिती दिली. भूपेंद्र यादव यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे ते त्यांच्याकडे तक्रार करणार आहे.

त्यानंतर खडसे यांनी आरोग्याच्या प्रश्नावरून आरोग्य मंत्र्यांची देखील भेट घेणार आहे.