पुणे: सध्या भाजपात अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे, पंकजा मुंडे हे पक्षात नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीर व्यक्त देखील केली आहे. खडसे यांनी तर अनेकदा पक्ष सोडण्याचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथराव खडसे आणि पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यात येईल असे वक्तव्य केले आहे. आज बुधवारी चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत होते. खडसे, पंकजा मुंडे, चंदशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना विधानसभेत तिकीट देण्यात आले नाही. यावरून त्यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. मात्र कोणतीही नाराजी नसून नाराजी असेल तर ती दूर करण्यासाठी पक्ष प्रयत्न करत असून त्यांना वेगळी जबाबदारी दिली जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेने आपले नेते सांभाळावे नंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांनी ऑफर देण्याचे भाष्य करावे असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.