खडसे परिवाराला चंद्रकांत पाटील नावाचा फोबिया — आमदार चंद्रकांत पाटील

खासदार व आमदार यांच्याकडून आमदार चंद्रकांत पाटील यांना बदनाम करण्याचे प्रयत्न आमदार चंद्रकांत पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप

मुक्ताईनगर प्रतिनिधी — आमदार एकनाथराव खडसे यांनी आज घेतलेला पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम आमदार चंद्रकांत पाटील यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केलेल्या तक्रारीमुळे रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे परंतु ही माहिती दिशाभूल करणारी असून आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी करणारी आहे असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे .या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की सुरुवातीला चार हेक्टर च्या वर शेती असल्यास त्या शेतकऱ्यांचा विमा नामंजूर होत होता परंतु चार हेक्टर वरील जमीन धारक शेतकऱ्यांना अपात्र करू नका अशी मागणी मी केली होती 2021 मध्ये कृषी विमा कंपनी ही बजाज अलायन्स होती चार हेक्टर पेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना विमा पासून अपात्र करू नका अशी मागणी केली होती त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सुद्धा विम्याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला होता त्यानंतर 2022 -23 मध्ये सरकारी सरकारची विमा कंपनी आली त्या काळात शेतकऱ्यांना असे वाटले की मोठ्या प्रमाणात शासनातर्फे विम्याचे संरक्षण मिळत आहे आणि विमा रक्कम ही मिळत आहे त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विम्याची नोंदणी केली परंतु या काळात विमाधारकांची व केळी पिक क्षेत्राची नोंदणी जास्त झाल्याने विमा प्रशासनाला त्याबाबत संशय निर्माण झाला होता. 14 जून 2021 रोजी तत्कालीन तहसीलदार श्वेता संचेती असताना कर्की येथे काही शेतकऱ्यांवर विमा कंपनीचे दोन-तीन एजंट आले आणि त्यांनी तुमच्याकडे केळी पीक नसतानाही 25000 घेऊन पिक विमा काढून देतो असे सांगितले त्यावेळेस करकी येथील बाळू महाजन या शेतकऱ्यांनी तसेच काही इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना हकीकत सांगून त्या एजंट ला पैसे घेताना रंगेहात पकडले होते आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली होती त्यानंतर मी आमदार चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी पोहोचलो होतो त्यामुळे किंग ऑपरेशन मी केले हा माझ्यावर खोटा आरोप लावण्यात आलेला आहे विमा एजंटांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होत असल्यामुळे शेतकऱ्यांनीच हे स्टिंग ऑपरेशन केले होते त्यात माझी कोणत्याही प्रकारची भूमिका नव्हती केवळ लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्या ठिकाणी हजर होतो त्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विमा रक्कम मिळाली व सरकारी कंपनीद्वारे विमा काढण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विमा काढले परंतु विमा काढल्यानंतर कंपनीद्वारा जिओ टॅगिंग करण्यात आले होते परंतु ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी होती त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा माझ्याकडे तक्रार केल्यामुळे सदरची जिओ टॅगिंग संदर्भात मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून थांबविण्यात आले होते त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला होता मी लोकप्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे परंतु गेल्या डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये पुन्हा ट्रेकिंगच्या तक्रारी आल्याने त्या संदर्भात बैठक घेण्यात आली त्या बैठकीस आमदार एकनाथराव खडसे तसेच खासदार रक्षा खडसे दोघेही लोकप्रतिनिधी गैरहजर होते जिओ टेकिंग चा हा प्रकार थांबविण्यात यावा या संदर्भात पालकमंत्री तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मांडण्यात आला व त्यावेळेस सुद्धा थांबविण्यात आले निकष बदलविण्यात आले नसते तर अनेक शेतकरी विमा रकमेपासून वंचित राहिले असते आमदार खडसे यांनी सांगितले की मी कृषीचे प्रधान सचिव यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे तर त्या संदर्भातील ते पत्र त्यांनी दाखवावे कारण तशा प्रकारची मी कोणतीही तक्रार प्रधान सचिव यांच्याकडे केलेली नाही हे केवळ मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. त्याचप्रमाणे या माध्यमातून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचाही हा प्रयत्न चालला आहे तीस वर्षात आमदार एकनाथराव खडसे यांनी शेतकऱ्यांसाठी काही एक केलेले नाही परंतु मी शेतकऱ्यांसाठी उभा राहत असल्याने त्यांच्या पोटात पोटसुळ उठत असल्याचेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील नावाचा त्यांना फोबिया झाला आहे.त्यामुळे आता मुक्ताईनगर येथे शंभर बेडची व्यवस्था मी करणार आहे. त्या ठिकाणी मानसोपचार तज्ञांना नियुक्त करण्यात येईल त्यांना त्यांच्यावर उपचाराची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार एकनाथराव खडसे यांच्या काळात सीएम वी चा एक पैसा देखील मिळालेला नाही परंतु मुख्यमंत्री जेव्हा मुक्ताईनगरला आले तेव्हा त्यांनी सीएमव्ही ची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल असे आश्वासन दिले होते त्यामुळे आता त्यावर चर्चा झालेली असून येत्या आठ दिवसात म्हणजे लवकरात शेतकऱ्यांच्या खात्यात सीएमव्हीची नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.