मुक्ताईनगर प्रतिनिधी….
येथील.खडसे महाविद्यालय येथे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.ए.महाजन यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य व समाज या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला व टिळकांनी राजकीय व समाज सुधारक म्हणून केलेल्या कार्याचा उपस्थितांना परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय डांगे यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रंथालय अधीक्षक प्रा. एन.जी. सरोदे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आर.टी. चौधरी, प्राध्यापक , रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.