मुक्ताईनगर प्रतिनिधी….
येथील खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रंथालयाचे अधीक्षक प्रा. सरोदे उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राध्यापक सरोदे यांनी आपण प्रत्येकाने महात्मा गांधीच्या तत्त्वाचा जीवनात अवलंब करून जीवन स्वावलंबी बनवावे असा मौलिक सल्ला दिला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ हेमंत महाजन यांनी ‘खादी मेरा अभिमान है…कर्म मेरी पूजा है…सत्य मेरा वचन है..और हिंदुस्तान मेरा जीवन है..| या महात्मा गांधीच्या उक्तीचे अवलोकन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य चौधरी, प्रा. नेहते, प्रा. किनगे, प्रा. साळवे, प्रा. चव्हाण, प्रा. पाटील, प्रा. थोरात, प्रा. अभिषेक पाटील, प्रा. खेडकर, प्रा. कोळी, प्रा. वंदना चौधरी, प्रा. प्रतिभा ढाके, प्रा. सविता जावळे, प्रा. छाया खर्चे, भानुदास बढे, पुंजाजी झोपे, सागर चौधरी, विजय जंगले व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कर्मचारी वर्गांची विशेष उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय डांगे यांनी तर प्रास्ताविक प्रा. डॉ. ताहिरा मीर यांनी तर आभार प्रा. दीपक बावस्कर यांनी मानले.