मुक्ताईनगर प्रतिनिधी….
येथील श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे व रेड प्लस सोसायटी, जळगाव यांच्या सहकार्याने आमदार एकनाथराव खडसे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खडसे महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना अॅड. रोहिणी खडसे यांनी नाथाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल प्राचार्य डॉ. हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ राजेंद्र चौधरी व एनएसएस कार्यक्रमाधिकाऱ्यांचे तसेच एनएसएस स्वयंसेवकांचे व इतर रक्तदात्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. त्याचबरोबर ‘रक्तदाता म्हणजे जीवनदाता होय’ म्हणून प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करून लोकांचा जीव वाचवावा अशी माफक अपेक्षा व्यक्त केली. तसेच मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सी.एस.चौधरी व त्यांचे चिरंजीव संजय चौधरी (पुणे) यांनी रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांचे व आयोजकांचे मनोबल वाढविले. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती .राजू माळी, विलास धायडे, बाळा भालशंकर, प्रदिप साळुंखे व जितेंद्र पाटील तसेच मुक्ताईनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात सुमारे 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले . याप्रसंगी प्रत्येक रक्तदात्याला रोहिणी खडसे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टिफिन बॉक्स व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या शिबिराचे संपूर्ण संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय डांगे प्रा. डॉ. दीपक बावस्कर व प्रा. डॉ.ताहीरा मीर तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ संजीव साळवे व डॉ प्रतिभा ढाके यांनी केले. त्याचबरोबर चंदन शिमरे, प्रणव पवार, नंदन महाजन, कृष्णकांत भारुडकर, सलोनी भोई, सानिका जावरे व भाग्यश्री भोळे इत्यादी एनएसएस स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले.