खडसे, मुंडे दोन्ही आम्हाला हवेत : आदित्य ठाकरे

0

मुंबई: विधानसभा निवडणूक झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे हे भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. खडसे यांनी आपली नाराजी जाहीर बोलून देखील दाखविली होती. पंकजा मुंडे यांनी देखील त्यांची नाराजी भगवान गडावरील भाषणात बोलून दाखविली होती. दोन्ही भाजप सोडणार अशी चर्चा देखील मध्यंतरी सुरु होती. मात्र दोघांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला नाही. दरम्यान संगमनेर येथील एका कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना खडसे हे महाविकास आघाडीत यायला हवे की पंकजा मुंडे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आदित्य ठाकरे यांनी दोन्हीही आमच्यासाठी महत्त्वाचे आहे असे विधान केले. दोन्हीही महाविकास आघाडीसाठी आवश्यक आहेत असेही त्यांनी सांगितले.

संगमनेर येथे युवा संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. यात युवा आमदारांशी संवाद साधण्यात आले. या कार्यक्रमात अभिनेते, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना मुलाखतीत प्रश्न विचारले यावर आदित्य ठाकरे यांनी हे भाष्य केले. या कार्यक्रमाला युवा आमदार मंत्री आदित्य ठाकरे , आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, झीशान सिद्धिकी, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील उपस्थित होते. त्यांची मुलाखत अवधूत गुप्ते यांनी घेतली.