खडसे वैफल्यग्रस्त : आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडसेंवर पलटलवार

मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी पत्रकार परीषद घेत आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध आगपाखड केली होती. या आरोपांचे खंडण करीत आमदार पाटील यांनी निवासस्थानी शनिवारी दुपारी चार वाजता पत्रकार परीषद घेत खडसेंवर टिकेचे बाण चालवले. आमदार म्हणाले की, मी सामान्य कुटुंबातील आमदार झाल्याचे अद्यापही खडसेंना रुचलेले नाही, ते वैफल्यग्रस्त झाले असून युती तोडण्याची घोषणा करणारे खडसे आता महाविकास आघाडीतही फूट पाडू पाहत आहेत.

मग 30 वर्षात खडसेंना हे का नाही जमले!
आमदार म्हणाले की, महाशिवरात्रीला मुक्ताई मंदिरात पुजेसाठी गेलो असता पुजारी, भाविकांनी मंदीर जीर्णोद्धाराचे काम गेल्या दिड वर्षापासुन बंद असल्याचे सांगितल्याने आठ दिवसात निधी मिळवून देतो, असा शब्द भाविकांना दिला होता. नंतर मंत्री आदित्य ठाकरे, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार यांच्यासोबत बैठक घेतली. वरील कामांसाठी शुक्रवारी पाच कोटींचा निधी मिळाला आहे. याचबरोबर मंदिर परीसरात जनाबाईचा मठ, ड्रोम आमदार निधीतून दिलेले आहेत. 30 वर्ष खडसेंना आमदार असताना संधी होती मात्र तेव्हा का विकास झाला नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मंदीराजवळील जुन्या गावाकडुन येणारा पुल मी मंजुर केला होता त्यातही खडसे म्हणताय मी पूल केला. मतदारसंघात योगा हॉल, पाणीपुरवठा योजना, रस्ते, सांस्कृतिक सभामंडप, स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.

याला म्हणतात ‘करंटेपणा’
जिल्हा परीषदेमधील 3054, 5054 हेडखाली 25 कोटींची रस्त्यांची
रस्त्याची कामे ज्यांनी थांबवली त्याला करंटेपणा म्हणतात. करंटे पणासारखे शब्द खडसे यांच्या तोंडून शोभत नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटीबद्ध आहे. खडसे हे मविआचे नेते आहेत. मी सुद्धा मविआमध्ये आहे. मविआमध्ये त्यांनी ठिणगी पाडण्याचा प्रयत्न करू नये. भाजपा-सेना युती तोडण्याची घोषणा करणारेच मविआ तोडण्याचे काम करतील, असा टोला त्यांनी हाणला. मी पाच कोटीच्या कामांना ‘स्टे’ आणला असे खडसे म्हणतात त्यांनी स्टे आणलेल्या कामांची यादी प्रसिद्ध करावी म्हणजे जनतेला समजेल, असेही आमदार पाटील म्हणाले. प्रसंगी स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, नगरसेवक संतोष मराठे, अफसरखान, गणेश टोंगे उपस्थित होते.