नजरेसमोर ठेवावीत.
कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची
अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातील सत्य खोदून बाहेर काढण्यासाठी हिंदी मीडियाने हा विषय आक्रमकपणे लावून धरला. त्यामुळेच ड्रग्ज व्यवसायाचा नवीन पैलू उघड झाला. सुरुवातीला या प्रकरणात काहीच दम नसल्याचे अनेकांना वाटत होते. त्यामुळे हे प्रकरण गुंडाळलेही गेले असते. दुसरे प्रकरण बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतचे आहे. बृहन्मुंबई महापालिकेने या अभिनेत्रीच्या कार्यालयाचे कथित अतिक्रमण हटविण्याची कारवाई चुकीच्या पद्धतीने केली आणि हा मुद्दा हिंदी मीडियाने डोक्यावर घेतला. कंगनावर अन्याय झाल्याची बोंबाबोंब झाली. शिवसेना पुरती खिंडीत गाठली गेली आणि त्यांच्या नेत्यांना मग यातून बाहेर निघण्यासाठी ठाकरे बँ्रडची आठवण झाली.
खडसेेंकडे मंत्रिपद असताना त्यांचा मुंबई-जळगाव-मुंबई प्रवास व्हायचा. जोपर्यंत ते मंत्रिपदावर होते तोपर्यंत त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी व्हायची. पण मंत्रिपद गेल्यानंतर खडसे यांना घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाणार्यांमध्ये दोन-चार निवडक कार्यकर्तेच दिसू लागले. खडसेंकडील मंत्रिपद गेले. त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे तिकीट त्यांची मुलगी अॅड. रोहिणी खडसे खेवलकर यांना देण्यात आले पण तोही पक्षाचा खेळ होता का ? कारण, मंत्रिपदानंतर आमदारकीही घरातून गेली. या सर्वांबद्दल खडसे साहेब अधून-मधून बोलत असतात, आपला संताप व्यक्त करतात. पक्षाला 40 वर्षात कसे मोठे केले? त्यासाठी किती कष्ट घेतले ? याच्या आठवणी लोकांना ऐकवतात. पण आता ते पक्षाला नको आहेत हे कटू सत्य स्वतः खडसेंनी स्वीकारायला हवे. अन्यथा एव्हाना पक्षाकडूनच त्यांचे पुनर्वसन व्हायला हवे होते.