खड्ड्यांनी घेतला धरणगाव तालुक्यातील तरुणाचा बळी

Bike accident near Kingaon: Death of a youth from Hanumantkheda यावल : तालुक्यातील किनगाव गावाजवळ चोपड्याकडून किनगावात येत असताना पुलाजवळील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीला अपघात होवून त्यात हनुमंतखेडा येथील गोपाळ हिरामण कुंभार या 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरूणाचा बळी गेल्याने नागरीकांमधुन संताप व्यक्त आहे.

खड्ड्यांनी घेतला तरुणाचा बळी
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर किनगाव गावाच्या लव्हाड नदीच्या पुलाजवळील रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून खड्ड्यांना चुकवतांना गेल्या महिन्या एक चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त झाले होते. याच ठिकाणी शनिवारी रात्री गोपाळ हिरामण कुंभार (35, रा.हनुमंतखेडा, ता.धरणगाव) हा तरूण दुचाकी (क्रमांक एम.एच. 40 व्ही. 5908) व्दारे येत असताना खड्डे चुकवण्याच्या बेतात दुचाकी सह रस्त्यावर कोसळला. त्याच्यावर किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून जळगावी हलवण्यात आले मात्र डोक्याला जबर मार बसल्याने जळगावात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.