खतरनाक मलोन वुल्फफ हल्ल्याचा कट उधळला

0

अहमदाबाद : इसिसशी संबंधीत दोघांना गुजरात एटीएसने रविवारी पकडले. एकाला भावनगरमधून तर दुसर्‍याला राजकोटमधून अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे वसीम आणि नईम रामोदिया असल्याचे सांगितले जात आहे. सुत्रांच्या माहीतीनुसार या दोघांपैकी एकजण हा क्रिकेट पंच आरिफ रामोदिया यांचा मुलगा तर दुसरा भाऊ आहे. आरिफ हे नुकतेच सौराष्ट्र विद्यापीठातून निवृत्त झाले आहेत. त्यांचे कुटूंब राजकोटच्या नेहरूनगर परिसरात राहते.

इसिसच्या या संशयीतांकडे गावठी बॉम्ब, गन पावडर, मास्क, कॉम्पुटरसह बरेच सामान जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या कॉम्पुटर आणि मोबाईल फोनमधून महत्वाची माहीतीही घेण्यात आली आहे. गुजरात एटीएसचे उप-अधिक्षक के. के. पटेल यांनी सांगीतले की, दोन्ही संशयीत हे मागील दीड वर्षापासून पोलिसांच्या रडारवर होते. हे दोघे ट्विटर, फेसबुक आणि टेलीग्राम नावाच्या मेसेजींग अ‍ॅपव्दारे आयएसआयएसच्या संपर्कात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, वसीम आणि नईम हे यापुर्वी काही पश्‍चिमी देशांत झालेल्या लोन वुल्फ सारखा हल्ला करण्याच्या तयारीत होते. ’लोन वुल्फ’ हल्ल्यात दहशतवाद्यांची मोठी टीम नसते. एकच दहशतवादी स्वताच्या निर्णयावर हा हल्ला करतो. असा हल्ला थोपवणे कठीण काम असते. दरम्यान, गुजरातमध्ये पकडण्यात आलेले संशयीत आरोपी बॉम्बस्फोट करण्याच्याही तयारीत असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

’लोन वुल्फ’ हल्ला म्हणजे काय?
’लोन वुल्फ’ म्हणजे असा भयंकर हल्ला ज्यात एकच अतिरेकी हल्ला घडवून आणतो. ज्यामध्ये तो जास्तीत जास्त लोकांचे सुरा किंवा अन्य घातक शस्त्राने शिरकान करत सुटतो. रक्ताचे पाट वाहतील असा भयंकर हल्ला तो करतो. लांडगा जसा आपल्या भक्ष्यावर तुटून पडतो आणि त्याची चिरफाड करतो अगदी तसाच हा अतिरेकी समोर दिसेल त्या व्यक्तीवर तुटून पडतो. या हल्ल्यात चाकू, सुरा, ग्रेनेडचा वापर केला जातो. हा हल्ला करताना किंवा नंतरही संबंधीत अतिरेकी कुणाशीही संपर्क साधत नाही.

इसिसच्या मॅगझीनमध्ये लोन वुल्फचा उल्लेख
अशा प्रकारे एकाच अतिरेक्याकडून होणार्‍या हल्ल्याचा सुगावा सुरक्षा यंत्रणांना लागणे अवघड होऊन बसले आहे. काही पश्‍चिमी देशांमध्ये अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत. तसेच कमी खर्चात अशाप्रकारचे हल्ले करता येत आहेत. आयएसआयएसचे मॅगझीन इन्सापयरमध्ये याबाबतचा उल्लेख आहे.