पोलादपूर । शिवसेना हडपसर शाखाप्रमुख अजय सकपाळ यांच्यावतीने रायगड जिल्ह्यात असलेल्या पोलादपूर तालुक्यातील गरजू कष्टाळू शेतकर्यांना खताचे वाटप रविवारी दत्तवाडी येथे करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल शिवसेना हडपसर शाखाप्रमुख अजय सकपाळ यांना महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. गोगावले यांनी तालुक्यातील गरजू गरीब शेतकर्यांना पेरणीपूर्वीच मोफत खत वाटपाचा उपक्रम स्तुत्य असून शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीस उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल सोपान कदम, संजय सपकाळ, दत्तात्रय जाधव, धनंजय कणसे, दिनेश निकम, मंगेश मोरे, सोपान शिंदे, यादव, संतोष इंगुलकर, भाऊ मकर, दामोदर सकपाळ, एकनाथ कदम, गोपाळ कदम, शंकर सकपाळ, कृष्णा कदम, प्रतीक सकपाळ, शुभम राठोड, नामदेव जाधव, दिलीप जाधव, बळीराम सकपाळ, संपत सकपाळ, विष्णू कदम, कलावती कदम आदी शेतकर्यांना खत वाटप करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचत सरपंच व सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला. सोपान कदम यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय सपकाळ यांनी आभार व्यक्त केले.