खतांचा पुरवठा वाढवुन मिळण्याबाबतचे निवेदन

0

नवापुर । शेतकी संघातील खतांचा पुरवठा वाढवुन मिळणेबाबतचे निवेदन भिलीस्थान टाईगरसेनेचे तालुका अध्यक्ष वाडग्या गावीत व पदधिकारी यांनी तहसिलदार प्रमोद वसावे यांना दिले आहे.

खतासाठी शेतकर्‍यांची भटकंती
निवेदनामध्ये नवापुर तालुक्यात शेतकी संघामार्फत जे खत शेतकर्‍यासाठी पुरवठा केले जात आहे. ते खत अतिशय कमी प्रमाणात पुरवठा होत असल्यामुळे शेतकयांना खतासाठी इतरत्र भटकावे लागत असल्याने शेतकर्‍याचे हाल होत आहे हि बाब लक्षात त्वरीत घेऊन खताचा पुरवठा नवापुर तालुक्यातील विसरवाडी,खांडबारा,चिंचपाडा,नवापुर,इतर ठिकाणी वाढवुन मिळावा व शेतकर्‍याना गरज पडेल व तेवढे खत उपलब्ध करुन दयावे असे निवेदनामध्ये म्हटले आहे. निवेदनावर वाडग्या गावीत, विजय गावीत, स्टेपन वसावे, दिनेश मावची, शाम कोकणी, रसिलाल कोकणी, मिथुन गावीत, अजय गावीत,अनेस गावीत,मनोज मावची,संजय मावची,नितेश सोलंकी यांच्या सह्या आहेत. ेण्यात आले आहे.