खत मिळत नसल्याने शेतकरी रस्त्यावर : नंदुरबारात रस्ता रोको आंदोलन

0
नंदुरबार : ऐन हंगामात खत मिळत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या गोष्टींचा निषेध नोंदविण्यासाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरातील शेतकी संघाच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन सुरू केले, त्यामुळे काही काळ डी,. आर.हायस्कूल ते नगरपालिका प्रयत्न रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती.
पोलिस अधिकारी यांनी मध्यस्थी करून आंदोलन निवळले. शेतात  ‘डोलनाऱ्या पिकांना युरिया खताचा मात्र देणे आवश्यक आहे, परंतु बाजारात कुठेही खत उपलब्ध नसल्याने शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे, शेतकी संघात देखील खतांची चणचण निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत, काल खत घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकी संघाच्या कार्यालयात गर्दी केली होती, पण खत नसल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे शेतकरी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले, शेतकी संघा समोरच असलेल्या रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले, वाहतूक खोळंबली असल्याने पोलिस अधिकारी यांनी मध्यस्थी केली व प्रकरण निवळले. या प्रश्नावरून 24 जुलै रोजी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात मोर्चा काढला. त्या ठिकाणी तहसीलदार पाटील यांना एक युरिया खताची गोणी भेट देऊन निषेध केला. एकंदरीतच खतांची टंचाई निर्माण होत असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र दिसत आहे.