खरं सांगायचं तर ती एक ट्रांसजेंडर आहे – तनुश्री दत्ता

0

मुंबई : कॉंट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. #MeToo मोहिमेतून राखीने तनुश्रीवर बलात्काराचे आरोप लावत ती ‘लेस्बियन’ असल्याचे सांगितले, आता तनुश्रीनेही राखीवर पलटवार करत ती ट्रांसजेंडर असल्याचे सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वीच राखीने तनुश्रीवर बरेच आरोप केले होते. तनुश्रीने तिचे हे सर्व आरोप नाकारले आहेत. अलिकडेच एका माध्यमाशी बोलताना तनुश्री म्हणाली, ‘राखीचे सर्व आरोप खोटे आहेत. ती फक्त अफवा उडवत आहे. खरं सांगायचं तर ती एक ट्रांसजेंडर आहे’. याबाबत सिनेसृष्टीतील बऱ्याच लोकांना माहिती आहे, असेही ती म्हणाली. राखी जे काही बोलते ते आत्मविश्वासाने बोलते. माझ्याविरोधात तिने जे पुरावे गोळा केले आहेत त्याने ती स्वत:चे नुकसान करुन घेत आहे. ती माझ्याबाबतीत काय बोलते, मला काहीही फरक पडत नाही’, असेही तनुश्री म्हणाली.