खरबर्डीत 27 लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात गॅसवाटप

0

नवापूर । नवापूर तालुक्यातील मौजे खरबर्डी ता. नवापूर येथे संयुक्त वनव्यवस्थापन समिती खरबर्डी अंतर्गत 5 जुलै 2012 शासन नियमानुसार 27 लाभार्थ्यांना वनविभागातर्फे सवलतीच्या दरात गॅस वाटप करण्यात आले. माजी जि.प अध्यक्ष भरत गावित व उपवनसंरक्षक वनविभाग शहादा पियुषा जगताप यांचा हस्ते गॅस वितरण करण्यात आले.

लाभार्थ्यांना दाखविले गॅस सिलिंडर व शेगडी यांचे प्रात्यक्षिक
यावेळीं सरपंच गुलाब गावित, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, संयुक्त वनसमितीचे अध्यक्ष दिनकर गावित, जिवल्या गावित, वनपाल ए.एन जाधव, कृष्णा गावित, भगवान साळवे, दिलीप वळवी, विद्या ठाकरे, मेघा बोरसे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन उपसरपंच गुलाब गावित यांनी केला. यावेळी माजी जि.प अध्यक्ष भरत गावित म्हणाले की वनविभागाची ही योजना फार चांगली आहे. याचा फायदा ग्रामस्थांनी घेतला पाहीजे. जंगल वाचले तर आदिवासी वाचणार आहेत असे ते म्हणाले. यावेळी गावमोगरा गॅस एजन्सीचे कर्मचारी प्रथमेश वळवी यांनी गॅस सिलेंडर व शेगडी यांचे प्रात्यक्षिक लाभार्थ्यांना करुन दाखविले. कार्यक्रमाचे सुञसंचलन वनपाल ए.एन जाधव यांनी केले तर आभार मेघा बोरसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौजे खरबर्डी गावातील वनसमितीचे अध्यक्ष, सदस्य, वन कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते