नेवासेफाटा : तालुक्यातील खरवंडी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने मुलासह पाण्यात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. 11 रोजी रात्री 7 च्या सुमारास मुळा उजवा कालव्यात घडली आहे. बाबासाहेब पोपट आलवणे (वय 35) असे या शेतकऱ्याचे नाव असून मुलाचे संकेत (वय 6) असे नाव आहे. दरम्यान बाबासाहेब यांचा मृतदेह गुरूवारी सकाळी 10 वा. कौठा शिवारात तर संकेत याचा मृतदेह शुक्रवार दि. 14 रोजी सकाळी 8 च्या सुमारास रस्तापुर शिवारात पाटाच्या पाण्यात आढळला.
या घटनेबाबत मयत बाबासाहेब आलवणे यांचे मेव्हणे सुधाकर अंबादास होंडे यांनी शनिशिगणापूर पोलीसांना हरवल्याची खबर देताना सांगीतले की, मंगळवार दि. 11 रोजी सायंकाली 7 वा. बाबासाहेब यांचा फोन आला. मी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करीत आहे. या घटनेची सोनई व शनिशिंगणापूर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दोघांचेही मृतदेह मिळाल्यानंतर पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला. मयत बाबासाहेब हे आजोबाच्या नावावर असलेली दोन एकर शेती करत होते.