येरवडा । स्वच्छ पुणे, स्वच्छ खराडी अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 चंदननगर खराडी या प्रभागातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहे, मुतार्या तसेच महापालिकेच्या शाळामधील स्वच्छतागृहे यांची नियमीतपणे सफाई करण्यात येणार आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा मधुकर पठारे यांच्या हस्ते आज चंदननगर बाजारात शिवाजी पुतळ्याजवळ पार पडला. नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, संजिलाताई पठारे, सुमनताई पठारे यावेळी उपस्थित होते. नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या संकल्पनेतून हे काम होणार आहे. यासाठी एका स्वतंत्र गाडीवर 500 लिटरची पाण्याची टाकी, प्रेशर मशीन तसेच जनरेटर याची सोय केलेली आहे.
सध्या प्रभागातील सर्व स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट आहे. स्वच्छता होत नसल्याने नागरिक त्यांचा वापर करत नाहीत व पर्यायाने रस्त्यावर लघुशंका करत असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीचा विचार करून स्वतः पुढाकारने प्रभागातील नगरसेवकांनी हा निर्णय घेतला आहे. दिवसातून दोन वेळा सर्व स्वच्छतागृहाची स्वच्छता केली जाणार आहे. या योजनेसाठी शरद पठारे व आशिष माने यांनी सहकार्य केले. यावेळी नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, आशिषजी माने, सदाशिव गायकवाड, संतोष पठारे आरोग्य अधिकारी मरकड सुषमाताई मुंडे व नागरिक उपस्थित होते.