खराबवाडीत एकाचा मृत्यू

0

खेड । खराबवाडी (ता. खेड) येथील जंबुकरवस्तीत भाडेकरू म्हणून राहणार्‍या एकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. रामभजन जंजाली (वय 46, रा. जंबुकरवस्ती, खराबवाडी. मूळ रा. छपिया, बस्ती, उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रामभजन जंजाली यांना त्यांचे शेजारी सकाळी पाणी भरण्यासाठी उठविण्यास गेले. परंतु, घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. यासंदर्भात संतोष भाऊसाहेब लेंडघर (रा. जंबुकरवस्ती, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, चाकण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.