खराबवाडीत दिराचा भावजयीवर बलात्कार

0

चाकण : भाऊ कामावर गेला असता घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन 19 वर्षीय भावजयीवर जबरदस्ती करून दिराने बलात्कार केला असल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दिरावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास चाकण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार नामदेव जाधव यांनी दिली.

भाड्याने घेतली होती खोली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना खराबवाडी येथील कर्मवीर सोसायटीत 30 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिलेचे सासरे व पती कामावर गेले असता घरात एकटी असल्याचा मोका साधून दिराने भावजयीवर जबरदस्तीने बलात्कार केला. याबाबतची अधिक माहिती अशी कि, पीडित महिलेचे 21 एप्रिल 2017 रोजी लग्न झाले असून पती, सासरे व दीर यांच्यासोबत एकत्र कुटुंबात खराबवाडी येथे भाड्याच्या खोली रहात होते.

विवाहितेने प्रकार आईला सांगितला
दिनांक 30 नोव्हेंबर रोजी पीडित महिलेचा पती व सासरे कामावर गेले असता दीर टीव्ही पाहत होता व भावजय खोली बाहेरच्या कट्ट्यावर बसली होती. मला कामावर जायचे आहे, डबा द्या असे सांगून पीडितेला घरात बोलावून दाराची कडी लावून जबरदस्ती करून तोंड दाबून बलात्कार केला. घडलेला प्रकार पती व सासरे यांना सांगूनही त्यांनी दिरास ताकीद देतो, कुणालाही सांगू नकोस, आपलीच इज्जत जाईल, तू शांत राहा असे सांगितले. त्यानंतर महिलेने घडलेला प्रकार आईकडे जाऊन सांगितला.

पतीची सासरच्यांना शिवीगाळ
त्याचा जाब विचारला असता पतीने विवाहितेच्या आईस शिवीगाळ केली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्चना दयाळ ह्या पुढील तपास करीत आहेत.