नवी दिल्ली । खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्वीकारण्यास बँका नकार देऊ शकत नाहीत, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले तसेच अशा बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता त्यावर तोडगा काढावा, असेही रिझर्व्ह बँकेने सांगितले. बँक कर्मचार्यांना नोटावर लिहण्याची सवय असल्यामुळे ते बँकेच्या क्लीन नोट धोरणाच्या विरोधात असल्यामुळे नोटांवर काही लिहू नये हा आदेश बँक कर्मचार्यांसाठी होता. असे रिझर्व्ह बँकेने सांगितले.
रिझर्व्ह बँकेकडे, गेल्या काही दिवसांत बँका रंग लागलेल्या ज्यांच्यावर काही लिहिले आहे, धुतल्याने रंग उडाला आहे, अशा नोटा स्वीकारत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. यामध्ये विशेषकरुन 500 आणि 2000 च्या नोटांचा समावेश होता. यानंतर रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत बँकांना या नोटा स्वीकारण्याचा आदेश दिला आहे तसेच सोशल मीडियावर अशा नोटा बँका स्वीकारणार नसल्याची अफवा पसरली होती. बँकांही आडमुठेपणा दाखवत नोटा स्वीकारण्यास नकार देऊ लागल्या. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा निर्णय दिला आहे. रिझर्व्ह बँकेने याकरिता डिसेंबर 2013 मध्ये काढलेल्या अध्यादेशाची आठवण करुन दिली आहे. ज्या नोटांवर काही लिहिलेले असेल त्या नोटा 2017 नंतर स्वीकारणार नसल्याची अफवा त्यावेळी पसरली होती. या अफवेला उत्तर म्हणून रिझर्व्ह बँकेने तो अध्यादेश काढला होता. त्यावेळीही खराब नोटा स्वीकारण्याबाबत कुठलीच सूचना काढली नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले होते.