नवी दिल्ली। अटारी सीमेवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच तिरंग्याचे स्थान खराब हवामानामुळे दोनदा बदलण्यात आले आहे. 120 फूट, 125 किलो वजन व पाच फूट पाया असलेल्या या तिरंग्याची उभारणी 5 मार्च रोजी करण्यात आली होती.
तिरंग्याच्या देखभाल समितीकडे आता केवळ 12 अतिरिक्त तिरंगे उरले आहेत. त्यामुळे या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. आम्हाला महिन्याला पाच राष्ट्रध्वज बदलायला लागले तर वर्षाला 60 राष्ट्रध्वज लागतील. यासाठी वर्षाला 60 लाख रुपये खर्ची होईल. त्यामुळे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, होळी आणि दिवाळी यांसारख्या सणांनाच राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा, असा प्रस्ताव नव्याने देखभाल समितीच्या बैठकीत मांडला जाईल, असे अमृतसर सुधार ट्रस्टचे अधीक्षक अभियंता राजीव सेख्री यांनी सांगितले.
हा राष्ट्रध्वज उभारताना त्यावर वार्याचा कशाप्रकारे परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यात आला नव्हता. त्यामुळे आता नवा तिरंगा उभारताना पूर्णपणे पॅराशूट मटेरियलचा वापर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.