शिंदखेडा । ग्राहक अनेकदा वस्तु किंवा सेवा खरेदी करतांना बील घेत नाही. खरा ग्राहक बनण्यासाठी त्याने विक्रेत्याकडे बिलाची मागणी केली पाहिजे, असे प्रतिपादन ग्राहक पंचायतचे वरिष्ठ मार्गदर्शक अॅड.वसंतराव भामरे यांनी केले. अॅड.भामरे तहसील प्रशासनच्या वतीने जागतिक ग्राहकदिनानिमित्त येथील तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अॅड.भामरे पुढे म्हणाले, ग्राहकांनी वस्तु खरेदी करतांना बीलासोबतच त्या वस्तुची उत्पादनाची तारीख, उत्पादन वापरावयाची अंतिम तारीख, एम.आर.पी. किंमत आदी तपासून पाहावे. वस्तुत भेसळ, डिफेक्टीव्ह, कन्टेट आदीची शंका असल्यास त्याच वस्तुचा नमुना ठेवून ग्राहक मंचात 5 प्रतित तक्रार दाखल करावी. बर्याचदा व्यक्ती ग्राहक व विक्रेता अशी दुहेरी भूमिकेत असतो.
सहाय्यक निबंधक यांनीही दिली माहिती
ग्राहक पंचायतीचे संघटक प्रा.सी.डी.डागा यांनी स्व.बिंदू माधव जोशी यांनी स्थापन केलेल्या ग्राहक पंचायतच्या कार्यप्रणालीची माहिती देऊन आजदेखील ग्राहक असुरक्षीत आहे. त्यासाठी अधिकार्यांनी देखील न्याय देण्याच्या भावनेने कार्य केले पाहिजे. म.टा.वितरण कंपनीचे हळवे यांनी ग्राहकांना मोबाईल अॅपचा वापर करुन विद्युत संबधि तक्रारीचे निदेशन करण्याचे आवाहन केले. सहाय्यक निबंधक पी.बी.बागल यांनी सहकारी संस्थासंंबधी माहिती दिली. व्यापारी असोसिएशनचे सलीम नोमानी, निरंजन वेंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी नायब तहसीलदार एम.डी.मोरे, संदेश नोकर, गणेश पिंगळे, सुधिर शिंदे, राजेश कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बी.पी.पाटील, ग्राहकपंचायतचे जितेंद्र मेखे, पी.एस.आय.जाधव, शोभा पवार, पूजा सनेर, आशा कोढळकर, गुलाबराव पाटील, माजी सरपंच डिगंबर पाटोळे, चंद्रकांत शिरसाठ, चंद्रकांत गोधवाली, प्रा.यु.डी.चौधरी, विजय भामरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रविंद्र ठाकूर यांनी केले.