खरीपाच्या नुकसानीचे ३६.१२ टक्के अनुदान खात्यात वर्ग

0

जळगाव । गेल्या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीपाचे जबर नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील सर्व १३४८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यासर्व गावांचा दुष्काळी गावात समावेश झाल्याने या गावांना शासनाकडून अनुदान मिळण्याची आशा लागून होती. पाण्याअभावी हातची पिकेही गेल्याने या शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळेच दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या अंतर्गत कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार आहे.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करून अनेक दिवस झाले असून खरीपाच्या नुकसानीचे अनुदान वाटपाला सुरूवात करण्यात आली असून दोन टप्प्यात हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुका सोडून इतर सर्व तालुके दुष्काळी जाहिर करण्यात आले आहे. दुष्काळाचा पहिला हप्ता ११९ कोटी ८९ लाख ६० हजार ६४० रूपये शासनाने मंजूर केले आहे. त्यापैळी ३६.१२ टक्के रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम येत्या चार ते पाच दिवसात जमा करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी दिली. जिल्ह्यात १३४८ गावे दुष्काळग्रस्त आहेत. त्यापैकी ७६४ गावांच्या याद्या तयार करण्यात आले असून यात १ लाख ९८ हजार ७६४ शेतकऱ्यांपैकी १ लाख २९ हजार ४०४ शेतकऱ्यांच्या खात्यात ४३ कोटी ३१ लाख १७ हजार ९३१ रूपये वर्ग करण्यात आले आहे.

खरीपाच्या नुकसानीचे ३६.१२ टक्के अनुदान खात्यात वर्ग
चाळीसगाव (१३६), भडगाव (६३), पाचोरा (१२९), चोपडा (११७), अमळनेर (१५४), रावेर (१२१), यावल (८४), पारोळा (११४), मुक्ताईनगर (८१), बोदवड (५१), भुसावळ (५४), जामनेर (१५२), जळगाव (९२) अशीएकुण १३४८ गावे दुष्काळी घोषीत करण्यात आली आहे.