पुणे । खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 932 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे़ नोटबंदीनंतर ही शेतकर्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकेने मदत केली आहे. बँकेचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जाळे आहे़ रब्बी आणि खरीप हंगामासाठी मोठ्याप्रमाणात बँकेकडून कर्ज दिले जाते, अशी माहीती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे़
बँकेने यंदा खरीपासाठी 1500 कोटी कर्जवाटपाचे उद्दीष्ट ठेवले होते़ नोटबंदीमुळे हजार आणि 500 च्या नोटा स्वीकारण्यास झालेली दिरंगाई यामुळे बँकेला 22 कोटींचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागला होता. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. शेतकर्यांचा पैसा बँकेत जमा असतो. त्यामुळे 22 कोटी बदलून दयावे लागणार आहेत. आतापर्यंत 551 कोटी रिझर्व्ह बँकेकडून बदलून देण्यात आले आहेत. दरम्यान नियमीत कर्ज भरण्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आल्याने जास्तीत जास्त शेतकर्यांनी कर्जभरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विविध पुरस्कारांचे वितरण
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दीपूर्ती वर्षानिमित्त यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, नागरी सहकारी पतसंस्था, सहकारी साखर कारखाने, दूध संघ, खरेदी विक्री संघ, नागरी सहकारी बँका यांना विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. इच्छ ुक संस्थांनी 1 ऑगस्टपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.