बोदवड । तालुक्यात सतत तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे व करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशी, सोयाबीन, ज्वारी, तूरसह सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकर्यांच्या हातात आलेला शेती माल बाजारात कवडीमोल दराने विकावा लागत आहे. शासनाने त्वरीत मका, सोयाबीन व तूर, ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष मधुकरराव दिनकरराव पाटील (मनूर खुर्द) यांनी बोदवड तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत
शेतकरी आधी निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडला आहे. बोदवड तालुका दुष्काळी घोषितत करावा, शेतकरी शेतमजुरांना रोजगार हमी योजनेमार्फत त्वरीत कामे उपलब्ध करून द्यावीत, महावितरणने शेतकर्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिले व्याजदंड आकारून शेतकर्यांवर मोठी थकबाकी दाखवून शेतकर्यांना लुटण्याचा प्रकार सुरू केला आहे.
वीज बिल माफ करा
वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे कनेक्शन कापण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. फसवी वीज माफीची योजना रद्द करून शेतकर्यांचे बिल माफ करावे व वीजपुरवठा खंडित करू नये, आदी मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
योग्य हमीभाव मिळावा
रंदाच्या पावसाळ्यात बोदवड तालुक्यात समाधानकारक पर्जन्रवृष्टी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जेमतेम पाण्यावरच मोठी कसरत करुन पीक हाती आले आहे. त्यातल्या त्यात पिकावर पडणारे रोग लक्षात घेता. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जीवाचे रान करुन पिकविलेल्या धान्यास मात्र शासनाकडून हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे खाजगी बाजारपेठेत व्रापारी देखील कवडीमोल भावाने धान्याची खरेदी करीत आहे. त्यामुळे धान्राची विक्री करुन उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. राकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्रकता असून लवरात लवकर धान्य खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.