खरेदी विक्री संघात काँग्रसचे वर्चस्व

0

शिरपूर । येथील शिरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीचा माघारीचा आज अंतीम दिवस होता. आज एकूण 17 जागांपैकी 4 जागांवर बिनविरोध निवड झाली. उर्वरीत 13 जागांसाठी 19 उमेदवार आज आपले नशिब आजमवले. यासाठी रविवारी मतदान घेण्यात आले. मतदानानंतर मतमोजणी करण्यात आली. यात आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलला 17 पैकी 16 जागा मिळाल्या. तर विरोधी परिवर्तन पॅनलला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले. खरेदी-विक्री संघाच्या इतिहासात पहिल्यांदा निवडणूक झाली. शिरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीत 8 जून ही उमेदवारी माघारीची अंतीम मुदत होती. यात 17 जागांसाठी 38 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होते. यामुळे बिनविरोध निवडणूकीची पंरपरा यावर्षी खंडीत झाली. मात्र, यावषी केवळ 4 जागा बिनविरोध झाल्याने 13 जागांसाठी 19 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. यात इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदार संघात 1 जोगसाठी जयंत पदमाकर देशमुख, शिरपूर , मोहन साहेबराव पाटील, बनावल यांच्यात लढत झाली. या लढतीत जयंत देशमुख यांना 241 मते मिळाली तर मोहन पाटील यांना 112 मते मिळाल्याने देशमुख हे विजयी ठरले.

सत्ताधारी गटाचा जल्लोष
सकाळी 8 ते दुपारी 4 दरम्यान उर्वरीत 13 जागांसाठी शांततेत मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी यांनी कामकाज पाहिले. व्यक्तीश मतदार गटात 521 मतदांनापैकी 293 म्हणजेच 56.23 तर सहकारी संस्था गटात 66 पैकी 64 मतदान होऊन 96.96 टक्के मतदान झाले. निकाल जाहीर होताच सत्ताधारी गटाने जल्लोष साजरा केला. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिसाका चेअरमन माधव पाटील, लक्ष्मण पाटील, के. डी. पाटील, भटू माळी , सुवालाल जैन यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला.

सोडत पद्धतीने सिसोदिया पराभूत
व्यक्तीशः मतदार संघात 5 जागांसाठी नंदलाल साहेबराव पाटील, बनावल(233), रविंद्र माधवराव पाटील, भटाणे (250), रामराव चैत्राम पाटील, हिंगोणी(248), सुधाकर नारायण पाटील, भाटपुरा(218), सुरेश आधार पाटील, कुवे(255) हे विजयी झालेत. तर विद्यामान संचालक शांताराम काशिराम महाजन, शिरपूर (59) व गोपालसिंह रणजितसिंह राजपूत, अजंदे बु. (71) पराभूत झालेत. सहकारी संस्था मतदार संघाच्या 7 जागांसाठी 10 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. यात पद्माकर यशवंत देशमुख, शिरपूर (35) , संतोष शिवलाल परदेशी, हिसाळे (41), प्रकाश भोमा पाटील, घोडसगाव (52), मनोहर रामचंद्र पाटील, गिधाडे(46), रमेश शंकर पाटील, जुने भामपूर(35), सुनिल लक्ष्ममण पाईल, करवंद(54), शांताराम काशिराम महाजन, शिरपूर(44) हे विजयी झालेत. तर मोतीलाल आत्माराम पाटील, तर्‍हाडी(18), देविदास मोतीराम पाटील, शिंगावे(22), प्रकाशसिंह निमडूसिंह सिसोदिया, अंजदे बु. (35) हे पराभूत झालेत. या गटात विद्यमान संचलाक पद्माकर देशमुख, रमेश पाटील व प्रकाशसिंह सिसोदिया या तिघांना एक समान म्हणजेच 35 मते मिळाल्याने सोडत पद्धती अवलंबल्याने सिसोदिया पराभूत झालेत.

घरणेशाहीचा वारसा
या निवडणूकीत माजी चेअरमन पदमाकर देशमुख यांच्या घरातील त्यांच्यासह पत्नी, मुलगा, व त्यांच्याकडे काम करणारे 1 असे 4 जण निवडणूक रिंगणात होते. चौघ निवडून आले आहेत. एकाच परिवारतील चौघ निवडणून आल्याने याला घराणेशाहीचा आधार असल्याचे स्पष्ट होत आहे. गत निवडणूकीत सुद्धा पदमाकर देशमुख यांच्यासह आई सुशिलाबाई देशमुख, सासू इंदुबाई पाटील यांच्यासह 2 मित्र असे 5 जण संचालकपदी विराजमान होते.